Konkan Sea : निसर्गाची खाण असलेल्या कोकणात तेलाचाही शोध सुरू,कोकणच्या समुद्रात ओएनजीसीचा सर्व्हे
समुद्र हे कोकणातील मुख्य आकर्षण, यामुळे पर्यटकांचा ओढा कोकणाकडे असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता कोकणातल्या याच समुद्राच्या पोटात दडलेल्या ऑईल आणि नॅचरल गॅसचा शोध घेतला जाणार आहे.
त्यासाठी सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड या बंदरापासून चाळीस नॉटिकल मेल अंतरावर म्हणजेच खोल समुद्रात हा सर्व्हे सुरु आहे.
या सर्व्हेला सिझमिक म्हणजेच भूकंपीय सर्वेक्षण असं म्हणतात.
ओएनजीसी या कंपनीमार्फत हा सर्व्हे सुरु आहे.
या काळात मच्छीमार बोटी किंवा इतर प्रकारच्या बोटींनी या भागात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
तशाप्रकारचं पत्र देखील संबंधित विभागांना आणि मत्स्य विभागांना देण्यात आलेलं आहे.
तशाप्रकारचं पत्र देखील संबंधित विभागांना किंवा मत्स्य विभागांना देण्यात आलेलं आहे.
त्यामुळे आता या कोकणातल्या समुद्रात तेलाचे आणि नैसर्गिक गॅसचे साठे मिळणार का? याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.