Fish Rate Hiked : मतलई वाऱ्यांमुळे कोकणातील मच्छिमारीला ब्रेक, माशांचे दर कडाडले!
कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा वातावरणातील बदलामुळे मच्छिमार व्यवसायिकांची चिंता वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमतलई वाऱ्यांनी सध्या मच्छिमारीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे मासेमारी ठप्प आहे.
उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रचंड वेगाने सोसाट्याचे वारे वाहू लागल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे येथील मच्छिमारांना मासेमारी करणे कठीण झालं आहे.
मच्छिमार करणाऱ्या नौकांनी मिळेल त्या बंदर तसंच खाड्यांचा आधार घेतला आहे.
पण सध्या मच्छिमारी बंद असल्याने माशांचे दर कडाडले आहेत.
पापलेटचा सध्याचा दर एक हजार रुपये किलो आहे. आधी हा दर 500 ते 700 रुपये किलो इतका होता.
सुरमई जी आधी 400 रुपये किलो मिळत होती त्यासाठी आता 700 ते 800 रुपये किलो दराने मिळत आहे.
सौंदाळा माशाला एका किलोसाठी 300 रुपये मोजावे लागत आहेत. पूर्वी 200 रुपये किलो मासे मिळत होते.
तर कोळंबीचा एका किलोचा दर सध्या 600 रुपये आहे. याआधी 450 ते 500 रुपये किलो दराने कोळंबी मिळत होती.