Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, वाचा नेमकं काय म्हणाले...
शिवसेना एकच आहे एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींची पूर्तता केल्याचे ठाकरे म्हणाले.
लोकशाहीचं रक्षण करावं अशी निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण केलं असल्याचे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवण्याचं काम केलं जात आहे. हे आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व बाबींची पूर्ता आम्ही केली आहे. तरीही आमच्या शपथपत्रावर आक्षेप घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.