Rabi crop : रब्बी पिकांच्या पेरणीत मोठी वाढ
सरकारनं रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांच्या पेरणीची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये आत्तापर्यंत रब्बी पिकांची 720 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात आगामी काळात तांदूळ (Rice), गहू (Wheat) यासह इतर धान्यांचा तुटवडा भासणार नसल्याचे केंद्र सरकारनं सांगितले आहे.
देशात आत्तापर्यंत 720 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. गहू, तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि भरड तृणधान्याखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.
रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. देशाच्या काही भागात रब्बी हंगामाच्या पेरण्या अजूनही सुरू आहेत. रब्बी पिकाखालील एकूण पेरणी क्षेत्र 2021-22 मधील 697.98 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. यावर्षी म्हणजे 2022-23 ही पेरणी 720.68 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.
यावर्षी 3.25 टक्क्यांनी रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. यावर्षी 2021-22 वर्षाच्या कालावधीपेक्षा यावर्षी बियाणांची पेरणी ही 22.71 लाख हेक्टरने अधिक आहे.
2021-22 मध्ये 35.05 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची पेरणी करण्यात आली होती. 2022-23 मध्ये 46.25 लाख हेक्टरवर भात पिकाची पेरणी करण्यात आली आहे. भाताच्या लागवडीखालील क्षेत्र 11.20 लाख हेक्टरने वाढले आहे.
तेलंगणा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये तांदळाखालील क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर गव्हाच्या पेरणीखालील क्षेत्र 300 लाख हेक्टरपेक्षा जास्त झाले आहे.
देशात तेलबियांची पेरणी 2021-22 मध्ये 102.36 लाख हेक्टरवरून 7.31 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा 109.84 लाख हेक्टर झाली आहे.
केंद्र सरकारने देशातील 370 जिल्ह्यांमध्ये डाळींचे उत्पादन वाढवण्याचे काम सुरू केले आहे. देशात कडधान्याखालील क्षेत्र 167.31 लाख हेक्टरवरून 167.86 लाख हेक्टरवर गेले आहे. 0.56 लाख हेक्टरची वाढ झालीआहे. मूग आणि मसूर डाळींच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तेलबियांखालील सर्वाधिक क्षेत्र वाढले आहे. दुसरीकडे, तेलबियांमध्ये मोहरीचे क्षेत्र 2021-22 मधील 91.25 लाख हेक्टरवरून 2022-23 मध्ये 6.77 लाख हेक्टरने वाढून 98.02 लाख हेक्टर झाले आहे.