Ratnagiri News : मार्लेश्वराच्या धबधब्याचं सुंदर रुप, पाहा फोटो
बाळू कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
02 Oct 2023 03:44 PM (IST)
1
रत्नागिरी जिल्ह्यामध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामुळे रत्नागिरीमधील मार्लेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.
3
रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच मार्लेश्वरचा धबधबा एवढ्या मोठ्या प्रवाहाने वाहत असल्याचं पाहायला मिळालं.
4
हा धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
5
पण या धबधब्याचा प्रवाह हा वेगाने सुरु आहे.
6
त्यामुळे पर्यटकांना या धबधब्याजवळ जाण्यास मनाई केली आहे.
7
तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे या धबधब्याने रौद्ररुप धारण केले आहे.
8
तर प्रशासनाकडून देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
9
पण या धबधब्यामुळे मार्लेश्वरच्या सौंदर्यात भर पडली आहे.