Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी, राहू-केतूच्या त्रासापासून मिळेल मुक्ती! शास्त्रानुसार 'हे' उपाय करा
शास्त्रानुसार, राहू-केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी गणेशाची पूजा हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. गणेशाला अर्पण केलेली दुर्वा राहुशी संबंधित मानली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वाच्या 21 जोड्या अर्पण केल्यास राहुमुळे होणारे दोष दूर होतात असे सांगितले जाते. गरिबी दूर होते.
कुंडलीत राहू-केतू अशुभ असल्यास मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि कुटुंबात कलह वाढतो. अशावेळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश द्वादश स्तोत्राचे पठण करावे. असे म्हणतात की राहु-केतू यामुळे समाधानी राहतात आणि त्रास देत नाहीत.
केतू दोष शांत करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गरजू व्यक्तीला हिरवे मूग दान करा. तुम्ही कोणत्याही गणेश मंदिरात तुमच्या क्षमतेनुसार वस्तू दान करू शकता.
राहु-केतू हे दोन अशुभ ग्रह तुमच्या करिअरमध्ये अडथळा आणत असतील, तर संकष्टी चतुर्थीपासून रोज 'श्री गं गणपतये नमः' चा जप सुरू करा. त्याचे शुभ परिणाम लवकरच दिसून येतील.
भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास राहू-केतूच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.
image 7
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 8:39 वाजता चंद्रोदय होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)