Ratnagiri Landslide : रत्नागिरीमध्ये दरड कोसळली, संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन दुर्घटना
Ratnagiri Khed Landslide : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळली. (PC:ABP Majha Reporter Khed)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क सोमवारी मध्यरात्रीपासून तुटला आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
गेल्या दोन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
तीन वर्षांपूर्वी याच परिसरात घरांवर दरड कोसळून दोन जण ठार झाले होते. (PC:ABP Majha Reporter Khed)
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 18 गाव बांदरी पट्ट्यात दरड कोसळली. (PC:ABP Majha Reporter Khed)
बांदरी पट्ट्यातील अस्तान-धनगरवाडी या ठिकाणी डोंगरावर भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
ही दरड मुख्य रस्त्यावरती सोमवारी मध्यरात्री कोसळली त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
अस्तान गावासोबतच वडगाव, बिरमनी, ही गावे देखील दरडग्रस्थ गावे असल्याने भूस्खलनामूळे परिसरात घबराट पसरली आहे. (PC:ABP Majha Reporter Khed)
तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत देखील याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून दोन जणांचा जीव गेला होता. (PC:ABP Majha Reporter Khed)