पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
सध्या पावसाळा सुरू असल्याने निसर्गाचं सौंदर्य अधिक खुललं आहे, धबधबे ओसंडून वाहत आहेत. नदीच्या पाण्याची पातळी वाढली, तर झाडांवरही निसर्गसौंदर्याचा वेगळाच रंग चढल्याचं दिसून येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाळी पिकनिची मजा घेण्यासाठी पर्यटक विविध ठिकाणी भेटी देत असून पावसाचा मनमुराद आनंद घेत आहेत.
कोणी धबधब्याला जाऊन मजामस्ती करत आहे, रस्ते मार्गावरील घाटांमधून निसर्गाचं सौंदर्य याची देही, याची डोळा अनुभवत आहे. मात्र, पिकनिक करताना वाह्यातपणा केल्यास पोलिसांचीही नजर तुमच्यावर आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील रघुवीर घाटात मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचं पाहायला मिळालं.
रविवारी सुट्टीच्या दिवशी रघुवीर घाटात पर्यटनाला येऊन रस्त्यामध्ये मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करत दारु जप्त केली आहे.
येथील रघुवीर घाटात दारू पिऊन स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकणाऱ्या पर्यटकांच्या विरोधात खेड पोलिसांनी कारवाई केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, पावसाळी पर्यटन करताना, पिकनिकला जाताना घाटात गाडी उभी करुन मजामस्ती करणे किंवा दारुपार्टी करणे कायद्यान्वये गुन्हा आहे. त्यामुळे, पर्यटकांनी असे कृत्य करु नये.