Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Chocolate Day 2024 : आज जागतिक चॉकलेट दिन! 'या' खास चॉकलेट डिश एकदा ट्राय कराच..लहानांपासून मोठे देखील होतील खूश
Yummy.. तोंडामध्ये लगेच विरघळणारं चॉकलेट कोणाला आवडत नाही, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचच चॉकलेट प्रिय आहे. चॉकलेटचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो जो लोकांना खूप आवडतो. जागतिक चॉकलेट दिवस दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो. म्हणूनच, या विशेष प्रसंगी तुम्ही काही खास पदार्थ बनवू शकता, सर्वांनाच आवडतील. जाणून घेऊया त्या चॉकलेट डिशेसबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचॉकलेट, जे कोको बीन्सपासून बनवले जाते. आज अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते, माहितीनुसार, चॉकलेटचा शोध हा अनेक वर्षांपूर्वी लागला आहे आणि दरवर्षी 7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिवस साजरा केला जातो. चॉकलेट डे निमित्त तुम्ही तुमच्या मुलांसोबत किंवा मित्रांसोबत काही खास चॉकलेट डिश बनवू शकता. हे पदार्थ बनवणे खूप सोपे आहे, तसेच त्यांची चव भारी आहे. जाणून घेऊया काही खास चॉकलेट डिशेसबद्दल.
चॉकलेट मफिन्स - मुलांना मफिन खूप आवडतात. तुम्हाला हवे असल्यास चॉकलेट चिप्स मफिन्स किंवा चॉकलेट भरलेले मफिन्स तुम्ही घरीच बनवू शकता. तुम्ही त्यांना स्नॅक्स म्हणून देखील देऊ शकता, ज्याची चव प्रत्येकाच्या मनाला आनंद देईल.
चॉकलेट लावा केक - चॉकलेट लावा केकचे नाव ऐकताच वितळलेले चॉकलेट आठवून तोंडाला पाणी सुटते. ही डिश बनवणे खूप सोपे आहे. जर तुमच्याकडे बेक करण्यासाठी ओव्हन नसेल तर तुम्ही कुकर वापरूनही बेक करू शकता. ही डिश मिठाईमध्ये सर्व्ह करा आणि मग पहा तुमच्या कुटुंबातील सदस्य कसे खूश होतील.
चॉकलेट मिल्कशेक - मुलांना मिल्क शेक खूप आवडतो. आज तुम्हाला हवं असेल तर त्यांच्यासाठी केळी किंवा मँगो मिल्क शेकऐवजी चॉकलेट मिल्क शेक बनवू शकता. त्यात चोको पावडर टाकून बनवले जाते. ते सर्व्ह करताना, तुम्ही काचेच्या आत चॉकलेट सिरप टाकू शकता आणि वरून देखील सजवू शकता.
चॉकलेट मोदक - मोदक हा एक अतिशय प्रसिद्ध मराठी गोड आहे, जो बहुतेक गणेशोत्सवादरम्यान बनवला जातो, परंतु तुम्ही चॉकलेट डेच्या निमित्ताने चॉकलेट मोदक देखील बनवू शकता. यामध्ये चॉकलेट, मावा आणि पिठीसाखर वापरली जाते. ही डिश पाहून घरातील प्रत्येकजण आनंदी होईल आणि त्याचा पुरेपूर आस्वाद घेईल.
चॉकलेट कुकीज - चॉकलेटपासून बनवलेल्या सर्वात सोपा आणि प्रसिद्ध पदार्थांपैकी एक म्हणजे चॉकलेट कुकीज. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते खायला आवडते. तुम्ही तुमच्या मुलांना पीठ आणि चॉकलेट चिप्स एकत्र मिक्स करून या कुकीज बेक करण्यात देखील सहभागी होऊ शकता.