जीम ते फुटविअर, हॉटेल ते फिल्म प्रोडक्शन, महेंद्रसिंह धोनीचा गुंतवणूक फंडा काय? वाचा सविस्तर!
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. त्यादे देशभरात लाखो चाहते आहेत. धोनी क्रिकेटर तर आहेच. पण गुंतवणुकीच्या बाबतीतही तो सर्वांत पुढे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहेंद्रसिंह धोनीने वेगवेगळ्या क्षेत्रात पैशांची गुंतवणूक केलेली आहे. काही स्टार्टअपमध्येही त्याने आपले पैसे लावलेले आहेत.
त्याने कपडे, हॉटेल, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, फिल्म प्रोडक्शन, फिटनेस अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गुंतवणूक केलेली आहे.
महेंद्रसिंह धोनीने ‘रीति स्पोर्ट्स’ नावाची स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीत आर्थिक गुंतवणूक केलेली आहे. ही कंपनी जगातील अनेक दिग्गज कंपन्यांचे मॅनेजमेंट सांभाळते.
धोनने 2016 साली ‘सेव्हन’ नावाने फुटविअर आणि कपड्याचे ब्रँड लॉन्च केले होते. धोनी एकटाच या संपूर्ण कंपनीचा मालक आहे.
धोनीने खाद्य आणि पेय स्टार्टअप 7 In Brews यामध्येही गुंतवणूक केलेली आहे. धोनीने ‘कॉप्टर 7’ नावाने एक चॉकलेट ब्रँडही लाँच केलेला आहे.
धोनीने ‘धोनी स्पोर्ट्सफिट’ नावाची एक फिटनेस कंपनी आहे. या कंपनीच्या देशभरात 200 पेक्षा अधिक फिटनेस चेन्स आहेत.
धोनीने चित्रपट उद्योगातही पाऊल ठेवलेले आहे. त्याचे ‘धोनी एंटरटेनमेंट’ नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. या प्रोडक्शन हाऊसने नुकतंच तमिळ भाषेतील गेट मॅरिड नावाच्या चित्रपटात गुंतवणूक केली होती.
धोनीने शाका हारी नावाच्या फूड कंपनीतही गुंतवणूक केलेली आहे. ही कंपनी प्लान्ट बेस्ड प्रोटीन तयार करते.
धोनीने गरुड एअरोस्पेस या कंपनीतही गुंतवणूक केलेली आहे. धोनी या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. ही कंपनी ड्रोन तयार करते.
महेंद्रसिंह धोनीचा झारखंडची राजधानी रांची येथे माही रेसिडेंसी नावाचे हॉटेल आहे. धोनीची एकूण संपत्ती 1030 कोटींपेक्षा अधिक असल्याचे मानले जाते. धोनीने 2011 मध्ये उत्तराखंड राज्यात एक आलिशान घर खरेदी केले होते. त्याची किंमत 18 कोटी रुपये होती.