Parshuram Ghat : वळणावळणाचा नागमोडी परशूराम घाट; ड्रोन कॅमेऱ्यानं टिपली घाट चौपदरीकरणाच्या कामाची दृश्य
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळुण नजीकचा परशुराम घाट सध्या वाहतूकीसाठी ठराविक वेळत बंद ठेवण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया घाटातील वाहतूक चौपदरीकरणाच्या कामासाठी 25 एप्रिलपासून दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुढचे दोन आठवडे वाहतूक पूर्णतः बंद आहे.
पर्यायी मार्गानं हलक्या वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे.
अवजड वाहनांची वाहतूक या वेळेत म्हणजेच, पाच तास पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे.
घाटातील वाहतूक बंद होऊन आजचा सहावा दिवस आहे.
या सहा दिवसांमध्ये युद्ध पातळीवरती घाटातील महामर्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे.
ड्रोनच्या माध्यमातून घाटातील सुरू असलेल्या कामाची काही दृश्य एबीपी माझानं टिपली आहेत.
या दृश्यांतून घाट किती वळणावळणाचा आहे, हे स्पष्ट होतंय.
सध्या घाटाचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच घाट प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.