रत्नागिरीत समुद्रकिनारी अडकलेल्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका; अंगावर काटा आणणारा थरार, Photo
कोकणात समुद्राच्या लाटांमध्ये, मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या दोन पर्यटकांची स्थानिक मच्छीमार तरुण आणि रत्नागिरी शहर पोलिसांनी सुटका केली आहे. (photo credit- abp majha)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळवारी संध्याकाळी रत्नागिरी शहराजवळच्या भाटये समुद्र किनारी रंगलेला मृत्यूच्या दाढेतील सुटकेचा थरार कॅमेरात देखील कैद झाला आहे. (photo credit- abp majha)
भाटये समुद्रकिनारी कोहिनूर पॉईंट आहे. त्या ठिकाणी जाण्याचा मोह एका पर्यटक दांपत्याला झाला. पण समुद्राच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली. (photo credit- abp majha)
अजस्त्र लाटा किनाऱ्याला धडकू लागल्या. त्यामुळे त्या ठिकाणावरून सुरक्षितरीत्या बाहेर पडणे या दाम्पत्याला अशक्य झाले. (photo credit- abp majha)
त्यांनी मोबाईल वरून रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फोन करून कल्पना दिली. पण निसर्गापुढे आणि समुद्राच्या अजस्त्र लाटांपुढे पोलिसांना देखील मर्यादा आल्या. (photo credit- abp majha)
बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये हे मच्छीमार तरुण देखील त्यांच्या मदतीसाठी धावले. (photo credit- abp majha)
या तरुणांनी देखील आपल्या जीवाची बाजी लावत दाम्पत्याला सुरक्षितरित्या बाहेर काढले.(photo credit- abp majha)