Dhulivandan 2023: शिमगो इलो रे... कोकणातल्या शिगोत्सवात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नाचवली पालखी

काल दिवसभर होळीचा उत्साह दिसून आल्यानंतर आज राज्यसह देश भरात धुळवडीचा उत्साह दिसून येतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
धुळवडीची राज्यातल्या वेगवेगळ्या भागात वेगळवेगळी परंपरा दिसून येते.

मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागात रंग खेळून धुळवड साजरी होते.
कुठे फुलांची उधळण होते कुठे रंगांची उधळण होते.
कोकणातल्या शिगोत्सवाचे रंग वेगळेच असतात.
धुळवडीच्या दिवशी इथे पालखी नाचवण्याची परंपरा आहे.
आज सकाळीच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही इथे उपस्थिती लावलीये.
कोकणात आज शिमगोत्सवात देवाच्या पालख्या मंदिराबाहेर पडण्याची परंपरा आहे.
मंदिराबाहेर देवाची साण म्हणजे, बसण्याची जागा असते तिथे या पालख्या बसतात अनेक गावात तर धुळवडीच्या दिवशी देव भेटीचा सोहळा असतो.
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी धुळवडीच्या कार्यक्रमात खांद्यावर पालखी घेऊन स्वतः पालखी नाचवली आणि धुळवडीचा आनंद लुटला.
आधुनिकतेच्या जगातदेखील तीच पारंपारिक पद्धत आणि मोठ्या उत्साहात साजरा होणारा सणांपैकी एक म्हणजे कोकणातील शिमगा.
सध्या कोकणातल्या प्रत्येक गावात ग्रामदेवतेच्या पालख्या सजवल्या गेल्यात.
या पालख्या सजवल्यानंतर आता गावातील प्रत्येक घरात जाण्यास सुरुवात झाली आहे.
पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे काही नृत्य प्रकार देखील सादर केले जात आहेत.