Holi 2023 : वर्षा बंगल्यावर आणि ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होलिका दहन
देशभरात काल होळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी होळी पेटल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वर्षा या शासकीय निवासस्थानी होळीचं दहन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहोलिकोत्सवात सहभागी होत मनोभावे पूजन केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच राज्यातील नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
जळणाऱ्या अग्नीसोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात व्हावेत आणि सद्विचारांचा सहवास घडावा अशी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील विविध ठिकाणच्या होळी उत्सवाला हजेरी लावली.
जय भवानी नगर इथे होळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या देशद्रोही विचारांच्या विरोधातील होळी पेटवण्यात आली.
देशद्रोही विचारांना तिलांजली देऊन देशप्रेमी विचार समाजात रुजावे तसेच त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी या होळीचे आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी होळी पौर्णिमेनिमित्त ठाणे शहरातील किसननगर इथे आयोजित होलिकोत्सवात सहकुटुंब सहभागी होत मनोभावे पूजन केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.
जळणाऱ्या अग्निसोबत राज्यातील अनिष्ट विचार होळीत दहन व्हावेत आणि सद्विचारांचा सहवास घडावा अशी प्रार्थना करत नागरिकांना होळी पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्याचं त्यांनी सांगितलं.