टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा 'मिस्ट्री स्पिनर'; पेन्शनच्या पैशानं घेतलेली पहिली बॅट, कोण आहे KKR चा 'हा' स्टार बॉलर?
Sunil Narine: कधीकाळी बॅट विकत घेण्यासाठीही पैसे नसलेला सुनील नारायण आज कोट्याधीश आहे. वडिलांच्या पेन्शनच्या पैशातून सुनीलनं आपल्या आयुष्यातील पहिली बॅट विकत घेतली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमूळात वेस्ट इंडिजकडून खेळणारा सुनील नरेन आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. दरम्यान, सुनील नारायण बऱ्याच वर्षांपासून शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एक भाग आहे. याशिवाय तो जगभरातील अनेक लीग्समध्ये खेळतो. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)
सुनील नारायण हा T20 च्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक. पण, सुनीलचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)
सुनील नारायणचे वडील शाहिद हे मुस्लिम असून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते लहान-सहान कामं करायचे. त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. एवढंच नाही तर सुनील नारायणचे वडील कधी टॅक्सी चालवायचे तर कधी रेस्टॉरंटमध्ये सफाई कामगार म्हणून काम करायचे. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)
सुनील नारायणचे वडील शाहिद नारायण सांगतात की, सुनीलला माझ्यापेक्षा जास्त खेळाची आवड होती. आमच्याकडे पैसे नव्हते, म्हणूनच आम्ही त्याच्यासाठी खूप जुने पॅड्स विकत घेतले होते. माझ्या आईनं तिच्या पेन्शनच्या पैशातून सुनीलसाठी पहिली क्रिकेट बॅट खरेदी केली होती. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)
सुनीलच्या कुटुंबासाठीही इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. पण त्यांनी हिम्मत हारली नाही आणि सुनीलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या कुटुंबानं गरीबीचा सामना करुनही त्यांच्या मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचवलं. दरम्यान, आयपीएल ऑक्शनमध्ये KKR नं खरेदी केल्यानंतर सुनीलचं नशीब पालटलं आणि आज सुनील नारायण कोट्यवधींचा मालक आहे. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)
कदाचित तुम्ही हे ऐकूण हैराण व्हाल की, आता सुनील नारायण कोट्यवधींचा मालक असला तरी, आजही त्याचे आई-वडील अजुनही त्यांच्या जुन्या दोन खोल्यांच्या घरात राहतात. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)