रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या डी मार्टच्या मॉल समोर सीएनजी वाहतूक करणाऱ्या टँकरमधून वायुगळती झाल्याची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटँकरमधून वायू गळती होत असल्याचे लक्षात येताच टँकर चालकाने बाहेर येऊन स्थानिकांची मदत मागितली.
स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले असून अग्नीक्षमण दल घटनास्थळी आले आहे. मात्र, या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती निर्माण झाली होती.
शहरापासून जवळच असलेल्या डी-मार्टजवळ अंदाजे सायंकाळी 7.30 ते 7.45 वाजता टँकर पोहचला असता, यातून वायूगळती होत असल्याचे लक्षा आले
दरम्यान, वायुगळतीमुळे टँकरजवळून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे दिसून आले.
अग्निशमन दलाकडून घटनास्थळी पोहोचताच टँकरमधील वायू गळती रोखण्याे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे, स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.