Stock Market : तीन वर्षात 4000 टक्के परतावा, चार दिवसांपासून 'या' शेअरला लागतंय अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल
अद्वैत इन्फ्राटेक या कंपनीनं वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागलं. बीएसईवर या कंपनीचा शेअर 1713.35 रुपयांवर होता.या कंपनीचा शेअर 52 आठवड्यामधील उच्चांकी पातळीवर 2260 रुपयांवर होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीला ऑप्टिकल ग्राऊंड वायरच्या पुरवठ्याचं आणि इन्स्टालेशनचं काम मिळालं आहे. एनआरएसएसनं हे काम अद्वैत इन्फ्राटेकला दिलं आहे. हे काम पुढील 7 महिन्यात पूर्ण करायचं आहे.
2024 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 187 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. तर, गेल्या वर्षभरापासून ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे शेअर आहेत त्यांना 221 टक्के लाभ मिळाला आहे.
गेल्या तीन वर्षात अद्वैत इन्फ्राटेकच्या शेअरमध्ये 4000 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
अद्वैत इन्फ्राटेकनं 2022 मध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर दिले आहेत. या कंपनीच्या प्रमोटर्सनी मार्च 2024 मध्ये आपली भागिदारी मी केली आहे. प्रमोटर्सकडे आता 69.44 भागिदारी आहे.