Chiplun Ratnagiri News : चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीत आई महाकाली देवीचा यात्रोत्सवाला उत्सवात सुरुवात
विविध परंपरेने नटलेले कोकण... कोकणात पारंपारिक रिती, परंपरा आजवरही कोकणकरांनी जपून ठेवल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील गावागावांतील ग्रामदैवताचा साजरा होणारा यात्रोत्सव लोकप्रिय आहे.
कोकणात यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यातीलच एक म्हणजे चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली येथील आई महाकालीचा यात्रोत्सव...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या ग्रामदैवतेच्या यात्रोत्सवाकडे पाहिले जाते.
महाराष्ट्रात देवालयांचा विचार केलास थोड्या अंतरावर ग्रामदैवता म्हणजे शक्तीदेवतांचा वास दिसून येतो आणि त्यांच्या समोर भाविक नतमस्तक होतो.
कुंभार्ली येथील शिरगाव, कुंभार्ली, पोपळी या तीन गावचे श्री सुखाही, वरदायिनी, महाकाली देवस्थान. हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आई असे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
महाशिवरात्रीपासून यात्रोत्सवाला सुरुवात होते.
शिरगांव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावातील मानकरी मंदिराच्या चौथाऱ्यात बसून या उत्सवाचे नियोजन करतात.
या यात्रेचे विशेष म्हणजे मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या परीसरात एका उंच, सरळ लांब लचक खांबावर (बगाडावर) आडवी फिरणारी लाट...
ही लाट फिरण्याअगोदर मंदिराच्या चौथाऱ्यात तीन गावातील मानकरी बसून पानाचे विडे मांडतात त्यानंतर त्याची विधीवत पूजा केली जाते.