Nashik : नाशिकमध्ये स्वाभिमानीचे आंदोलन, रस्त्यावर कांदा आणि द्राक्ष फेकून सरकारचा निषेध
शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नासंदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana) वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक (Nashik) जिल्ह्यात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी (Wani) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-सुरत महामार्गावर (Shirdi-Surat highway)आंदोलन सुरु केलं आहे.
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाताखाली वणी येथे आंदोलन सुरु आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे द्राक्ष रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला.
सरकारला जर लोकशाही मार्गाची भाषा समजत नसेल तर अधिवेशनादरम्यान विधानभवनावर कांदे, द्राक्ष आणि जिल्हा बँकेच्या नोटीसा फेकू असा इशारा संदीप जगताप यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीन चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या विविध भागात आंदोलन सुरु आहे.
स्वाभिमानीच्या कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. सरकारने शेतीमालाच्या दरासंदर्भात चुकीची धोरण अवलंबल्याची टीका आंदोलकांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
वणी मध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्ता रोको केल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.
सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
सध्या सोयाबीन, कापूस आणि कांद्याचे दर घसरल्यामुळं आंदोलन सुरु