Ambedkar Jayanti : बाबासाहेबांच्या मूळगावी पहिल्यांदाच शासकीय जयंती साजरी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी म्हणजे आंबडवे गावात प्रथमच शासकीय जयंती साजरी करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यात आंबडवे हे गाव आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आंबेडकर जयंती साजरी झाली.
महत्त्वाचं म्हणजे उदय सामंत यांनी गेल्यावर्षी याच दिवशी आंबडवे गावात शासकीय जयंती साजरी केली जाणार अशी घोषणा केली होती.
यावेळी त्यांच्या शिवसेना नेते भास्कर जाधव, खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, शेखर निकम, निरंजन डावखरे तसंच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केले.
दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.