Ambedkar Jayanti : आंबेडकर जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर भिमसैनिकांची गर्दी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरातील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवरच बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.
बाबासाहेबांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते.
धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो किंवा बाबासाहेबांची जयंती अशा सर्व महत्त्वाच्या दिवशी दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
या ठिकाणी लोक येऊन भव्य स्तूपामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करतात, सोबतच बाबासाहेबांच्या अस्थिकलशांचेही दर्शन घेतात.
स्तूपाच्या समोरच बाबासाहेबांची प्रतिमा असून आज सकाळपासूनच लोक त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या लावत आहेत.
त्या ठिकाणी नतमस्तक होऊन बाबासाहेबांप्रति आपली श्रद्धा व्यक्त करत आहेत.