Hibiscus For Hair Fall: डोक्याला लावा जास्वंदाच्या फुलाची 'ही' पेस्ट, केस गळतीपासून सुटका मिळवा
तुम्ही जास्वंद या फुलापासून तयार केलेली ही पेस्ट डोक्याला लावली तर स्काल्फ थंड राहतो आणि केस गळती देखील कमी होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाणून घेऊयात जास्वंदाच्या फुलापासून पेस्ट तयार करण्याची सोपी पद्धत...
जास्वंदाच्या फुलाची पेस्ट तयार करण्यासाठी तीन ते चार जास्वंदाची पाने आणि जास्वंदाचे फुले मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा.
जास्वंदाच्या फुलाच्या आणि पानाच्या पेस्टमध्ये 4 चमचे दही घाला. दही घातल्यानंतर ही पेस्ट मिक्स करा.
जास्वंदाच्या फुलाची ही पेस्ट तुमच्या केसांवर आणि स्काल्फवर लावा.
जास्वंदाच्या फुलांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि एमिनो अॅसिड्स आढळतात. फ्लेव्होनॉइड्समुळे डोक्याच्या भागात रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
जास्वंदाच्या फुलांमध्ये असणारे अमीनो अॅसिड केसांमध्ये केरेटिन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे केसांना शाइन येतो आणि केस लांब होतात, यामुळे केस दाट देखील होतात.
जास्वंद या फुलामध्ये असे गुणधर्म आहेत जे आपल्या स्कॅल्फला उन्हामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात.