हिरवा निसर्ग हा भवतीने...गावताचा शालू, फेसळणाऱ्या धबधब्यांनी रघुवीर घाट नटला!
सातारा आणि रत्नागिरीला जोडणारा खेड तालुक्यापासून 25 किलोमीटरवर असलेला सह्याद्री कुशीतील नागमोडी वळणाचा रघुवीर घाट.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसह्याद्रीच्या उंचच उंच रांगांवर पावसाळ्यात काळ्या कपारीवर उगवलेल्या हिरव्यागार गवताच्या शालूने आणि त्यात फेसळणारे धबधब्यांनी पर्यटकांनी भुरळ घातली आहे.
नागमोडी वळणातून प्रवास करताना शेकडो प्रवाहित झालेले धबधबे आपल्याला पाहायला मिळतील. या फेसाळणाऱ्या धबधब्यांचा मनमुराद आनंद पर्यटक तिथे थांबून लुटत आहेत.
याच नागमोडी वळणातून प्रवास करीत पुढे-पुढे जात असतांना दाट धुक्याची चादर सरवत्र पसरलेली आपल्याला दिसते.जणू काही स्वर्गच धरतीवर अवतरलाय का याचा भास होतो.
एका बाजूला शिरगाव-खोपीच डूबी धरण तर दुसऱ्या बाजूला उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा यातून उडणारे तुषार जणू काही गगनाला गवसणी घालतात.
सह्याद्रीच्या पर्वत रांगातून फेसळणारे असंख्य धबधबे खळखळत वाहत वाहत शिंदी गावातील नदीला मिळतात.
या रघुवीर घाटाची सफर म्हणजे एक अविस्मरणीय वर्षा सहल. या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेरील शेकडो पर्यटक मौज मजा करण्यासाठी इथे येतात.
मात्र या घाटातील मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पर्यटकांनी अतिउत्साही पणा न करता आपली काळजी घेतली पाहिजे.
निसर्गाने कोकणाला भरभरुन दिले आहे. त्यात पावसाळ्यात कोकणातील निसर्ग सौदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते.