Ratan Tata Death: रतन टाटा यांच्यासोबत घट्ट मैत्री, विश्वास जिंकला, कायम सावलीसारखा राहिला; कोण आहे शांतनू नायडू?
Ratan Tata Death: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. (Image Credit- Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Image Credit- Social Media)
रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच रतन टाटा यांचा स्वीय सहाय्यक शांतनू नायडूने भावूक पोस्ट केली आहे. (Image Credit- Social Media)
शांतनू याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पुणे येथे झाला. (Image Credit- Social Media)
खुद्द रतन टाटा यांनी फोन करुन, तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा शांतनूला केली होती. (Image Credit- Social Media)
अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शांतनूकडून घेतात, असेही सांगितले जाते. (Image Credit- Social Media)
भटक्या श्वानांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा यांची शांतनूसोबत जवळीक वाढली. (Image Credit- Social Media)
शांतनू यांच्या कामाने टाटा खूप प्रभावित झाले होते. 2018 पासून रतन टाटा यांच्यासोबत शांतनू काम करत आहे. (Image Credit- Social Media)
शांतनू नायडू याची गुडफेलोज ही कंपनी आहे. या कंपनीचा संस्थापक आहे. (Image Credit- Social Media)
ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी ही कंपनी कार्यरत असते. (Image Credit- Social Media)
गुडफेलोज या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे. (Image Credit- Social Media)