Ratan Tata Passed Away : ...आता रतन टाटांच्या 3800 कोटींच्या साम्राज्याचा उत्तराधिकारी कोण?
जगातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवार 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा आजारी असल्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्योगपती रतन टाटा हे भारतासह जगभरात त्यांच्या परोपकारी कार्यासाठी ओळखले जात होते. रतन टाटा यांनी कधीही लग्न केले नाही हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळं त्यांच्या निधनानंतर 3800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असणार? हा प्रश्न सर्वाना पडला आहे....
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे लग्न झालेले नाही. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये काम करत असताना ते प्रेमात पडल्याची माहिती खुद्द रतन टाटा यांनी सांगितले. पण त्यांच्या आजीची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती, त्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले.
आपले प्रेमही भारतात येईल अशी आशा रतन टाटांना होती, पण तसे झाले नाही. रतन टाटा यांनी सांगितले होते की, 1962 मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा मुलीचे पालक लग्नाच्या निर्णयावर सहमत नव्हते आणि त्यांचे नाते तुटले.
रतन टाटांच्या निधनानंतर उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या कुटुंबातील नोएल टाटा यांचं नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे. नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन यांच्या पोटी जन्मलेल्या नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहे. त्यामुळे रतन टाटांच्या निधनानंतर मोठे असलेले नोएल टाटा हेच त्यांच्या संपत्तीचे वारसदार असू शकतात.
तसेच नोएल टाटा यांची तीन मुलं आहेत. त्यामुळं जर रतन टाटा यांच्या संपत्तीचे वारसदार जर नोएल टाटा ठरले तर त्यांची मुले पुढे हा वारसा चालवतील. माया टाटा, नेविल टाटा आणि लिया टाटा या तीन मुलांचा समावेश आहे.