In Pics : रायगडमध्ये कार अन् ट्रकची जोरदार धडक, कारचा चक्काचूर
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगडमध्ये माणगावजवळ रेपोली इथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.
गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. तर गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना आज (गुरुवारी) पहाटेच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर घडली.
कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि अपघात झाला. या अपघातात कारमधील सर्वच्या सर्व 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, या अपघातात चार वर्षांचा चिमुकला बचावल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.
अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहनं बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.