फक्त 25 रुपयांमध्ये धावणार 125 किलोमीटर; जबरदस्त फीचर्ससह 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर झाली लॉन्च
इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप हॉप इलेक्ट्रिकने लिओ इलेक्ट्रिक (HOP Electric) स्कूटरचा नवीन हाय-स्पीड प्रकार लॉन्च केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीचा दावा आहे की, या हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरला 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी फक्त 20 पैसे मोजावे लागतील.
तर पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही स्कूटर 125 किलोमीटरपर्यंत धावू शकते. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 97,000 रुपये इतकी ठेवली आहे.
हॉप लिओ इलेक्ट्रिक स्कूटर 2.2 kW BLDC हब इलेक्ट्रिक मोटरद्वारे धावते. जी 90 Nm पीक टॉर्क आउटपुट तयार करते.
ही मोटर सुलभ हॅण्डलिंग आणि सुरळीत रायडिंगसाठी जबरदस्त आहे. यात 2.1 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की, 850W चा स्मार्ट चार्जर वापरून 2.5 तासात बॅटरी 0-80 टक्के चार्ज होऊ शकते. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 125 किलोमीटरची रेंज देऊ शकते.
Hop Leo हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरला 160mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. त्यामुळे खडबडीत रस्त्यावरून सहज वाहन चालवता येते.
याची लोडिंग क्षमता 160 किमी आहे. यात थर्ड पार्टी जीपीएस ट्रॅकरसह एलसीडी डिजिटल कन्सोल देखील मिळतो.
स्कूटर ब्लॅक, व्हाइट, ग्रे, ब्लू आणि रेड या 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हॉप लिओला चार राइडिंग मोड मिळतात, ज्यात इको, पॉवर, स्पोर्ट आणि रिव्हर्स समाविष्ट आहेत.