शुभमनचं द्विशतक, मायकेल ब्रेसवेलचा पलटवार; भारताची भेदक गोलंदाजी, पाहा पहिल्या सामन्यात काय झालं?
रोहित शर्माच्या टीम इंडियानं न्यूझीलंडचा पहिल्या वन डेत 12 धावांनी पराभव केला. भारतानं या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाच्या या विजयी सलामीचा शुभमन गिल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं १४९ चेंडूंत २०८ धावांची खेळी केली. त्याच्या द्विशतकाला १९ चौकार आणि नऊ षटकारांचा साज होता. त्यामुळंचं टीम इंडियाला ५० षटकांत आठ बाद ३४९ धावांची मजल मारता आली.
मायकेल ब्रेसवेल आणि मिशेल सॅन्टनरच्या सातव्या विकेटसाठी रचलेल्या १६२ धावांच्या भागिदारीनं न्यूझीलंडला विजयाची संधी दिली होती.
पण भारतीय गोलंदाजांनी १२ धावांनी विजय खेचून आला. ब्रेसवेलनं १४०, तर सॅन्टनरनं ५७ धावांची झुंझावाती खेळी उभारली.
34 धावा करुन रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर त्यानंतर विराटही स्वस्तात तंबूत परतला. ईशानही दुहेरी संख्या गाठू शकला नाही. पण या एका बाजूने शुभमन मात्र टिकून खेळत होता. त्यानं शतक पूर्ण केलं, तेव्हा सूर्याने 31 तर पांड्याने 28 धावांची साथ शुभमनला दिली. पण दोघेही बाद झाल्यावरही शुभमनने तुफान फलंदाजी करत द्वीशतक पूर्ण केलं. त्यानं 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकार ठोकत 208 धावा केल्या ज्यामुळे भारताची धावसंख्या 349 पर्यंत पोहोचली.
न्यूझीलंडचा संघ 350 धावाचं तगडं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरला आणि सुरुवातीपासून त्यांचे फलंदाज बाद होऊ लागले.
कॉन्वे 10 धावांवर बाद झाल्यावर इतरही फलंदाज स्वस्तात बाद होत होते. फिन अॅलननं 40 धावांची चांगली खेळी केली. पण तो देखील शार्दूल ठाकूरचा शिकार झाला. एकीकडे पटापट विकेट पडत असताना सातव्या विकेटसाठी मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी एक अप्रतिम भागिदारी केली. पण सँटनर 57 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने षटकार चौकार ठोकत ब्रेसवेल लक्ष्याचा पाठलाग करतच होता. पण हार्दिक पांड्याने 49 वी ओव्हर अप्रतिम टाकत एक विकेट घेत केवळ 4 रन दिल्या.
अखेरच्या षटकात 20 धावा न्यूझीलंडला हव्या होत्या. शार्दूल गोलंदाजीला आला पहिला बॉल सिक्स तर दुसरा वाईड टाकला. त्यानंतर मात्र शार्दूलनं अप्रतिम यॉर्कर टाकत ब्रेसवेललं पायचीत केलं आणि सामना भारताने 12 धावांनी जिंकला.
अटीतटीच्या लढतीत भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. 350 धावांचे तगडे लक्ष्यही न्यूझीलंडने जवळपास गाठलेच होते, पण अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरनं अप्रतिम विकेट घेत भारताला सामना जिंकवून दिला.