पनवेल येथे 276 वर्षांचा पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा, 'कोरड्या' मारण्याची परंपरा
पनवेल येथे 276 वर्षांचा पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा, 'कोरड्या' मारण्याची परंपरा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगड जिल्ह्यातील पनवेल येथे पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातील नाथपंथीय समूहाच्या श्रद्धेच्या मानाचा असलेला दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
पनवेलकरांचे प्रमुख आकर्षण ठरलेली दहीहंडी सोहळ्यामार्फत सुमारे 276 वर्षांची परंपरा जपण्यात येत आहे .
पनवेल शहरात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवात सर्वाधिक आकर्षण ठरते ती नाथ समुदायाची दहीहंडी.
सुमारे 276 वर्षांची परंपरा असलेल्या नाथ समुदायाची दहीहंडी साजरी करताना परिसरातील नऊ नाथांचा समुदाय एकत्र येतो.
यामध्ये, कानिफनाथ, मछिंद्रनाथ अशा दहा आस्थान एकत्र येऊन मंदिरात पूजा करून प्रथमतः मानाची दहीहंडी फोडून सोहळ्याला सुरुवात करण्यात येते.
यावेळी, परिसरातील नऊ नाथांच्या आस्थानातील भाविक आणि तरुण हे मानाची हंडी फोडण्यासाठी एकत्र येतात.
यावेळी, श्रद्धाळू भाविकांच्या अंगात आलेला 'वारा' हा 'कोरड्या' मारून काढण्याची परंपरा आहे.
दरम्यान, नाथ पंथीयांची श्रद्धेच्या या दहीहंडीच्या उत्सवात कोणतेही मानवी थर लावले जात नाही.
तर, गेल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या हंड्या या 'श्रद्धे'ने भरलेल्या असल्याने या पाहण्यासाठी अनेक रहिवासी हजेरी लावतात.