Omega-3 In Food : निरोगी हृदयासाठी ओमेगा-3चा समावेश आहारात करा; फिट राहा
तुम्हाला हदय निरोगी ठेवायचं असेल तर आहारात ओमेगा-3 चा समावेश नक्की करा. याचे फायदे जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआळशी (Flaxseeds) म्हणजेच फ्लेक्ससीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. तुम्ही जवसाचे लाडू, नॅचरल बिया बारीक करून पावडर बनवू शकता किंवा दुधासोबत सेवन करू शकता.
अंड्यांमध्येही ओमेगा-3 फॅटी ॲसिडही पुरेशा प्रमाणात आढळते. दररोज अंडी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अनेक महत्त्वाची पौष्टिक तत्त्वेही पूर्ण होतात.
सुक्या मेव्यामध्ये ओमेगा- 3 (Omega-3) फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते. यापैकी, अक्रोड हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. तुम्ही अक्रोड कधीही खाऊ शकता.
शाकाहारी व्यक्ती हिरव्या भाज्या खाऊन ओमेगा- 3 (Omega-3) ची कमतरता दूक करु शकतात. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमन आणि मिनरल्स असतात, हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.
गाईच्या दुधातही ओमेगा - 3 फॅटी ॲसिड आढळते. याशिवाय गायीचे दुधात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आढळते, हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं.
ओमेगा -3 च्या नैसर्गिक स्त्रोतामध्ये ब्लूबेरीचे सेवन करणे देखील फायदेशीर मानले जाते. त्यात खूप कमी कॅलरीज असतात आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. ब्लूबेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.