Dahi Handi : अलिबागमधील 'विहीरी'तील दहीहंडी पाहिलीत?
तुम्ही कधी उडी मारून दहीहंडी फोडली का ? अलिबाग तालुक्यातील कुर्डुस येथील तरुण हा थरारक खेळ खेळताना दिसून येतात, ते ही विहिरीच्या कठड्यावरून सुमारे 10 ते 15 फूट उंच उडी मारून ही दहीहंडी फोडण्यात येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहीहंडीचा उत्सवामध्ये आज थरांवर थर रचून रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर बक्षीशांच्या रकमांमध्ये ही मोठी वाढ होऊ लागली आहे.
परंतु, ग्रामीण भागातील दहीहंडीची गंमत काही औरच आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डुस येथे चक्क विहिरीच्या मधोमध दहीहंडी बांधण्यात येते.
सुमारे 30 वर्षांपूर्वी सुरू झालेली ह्या दहीहंडीचा आनंद आजही घेण्यात येतो.
यासाठी, सुमारे ३० फूट रुंदीच्या विहिरीच्या मधोमध सुमारे १५ फूट उंच दहीहंडी बांधण्यात येते. तर, ही दहीहंडी फोडण्यासाठी विहिरीच्या कठड्यावर बसून एका तरुणाला खांद्यावर घेऊन त्याला हंडीच्या दिशेने फेकण्यात येते आणि यावेळी त्या तरुणाने दहीहंडीला हात लावला तर जल्लोष करण्यात येतो.
अलिबाग तालुक्यातील कुर्डुस येथील थरारक अशी ही दहीहंडी तरुणांचे आणि गावकऱ्यांचे आकर्षण बनली आहे.
अलिबाग येथील कुर्डूस येथे आगळीवेगळी 'विहीरी'तील दहीहंडी
विहिरीच्या मधोमध हंडी बांधून फोडण्याचा प्रयत्न
विहिरीच्या कठड्यावर उभे राहून उडी मारून हंडी फोडण्याची प्रथा