PHOTO : कुस्तीचा आखाडा मारणाऱ्यांना मिळाली म्हैस अन् बकरे
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
11 May 2022 10:47 AM (IST)
1
पुण्याच्या मावळमध्ये कुस्तीचा आखाडा मारणाऱ्या पैलवानांना बक्षिसात चक्क म्हैस आणि बकरे देण्यात आली. पैशांऐवजी शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणारे प्राणी देण्याचा आयोजकांचा या मागचा हेतू होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दारुंब्रे गावातील काळभैरवनाथ आणि वाघजाई मातेच्या उत्सवानिमित्त हा कुस्तीचा आखाडा भरला होता.
3
म्हैस आणि पाच बकऱ्यांना जिंकण्यासाठी जवळपास पाचशे पैलवान आखाड्यात उतरले होते. यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मल्ल मावळात दाखल झाले होते.
4
नागेश राक्षे आणि सुहास कदम या दोन मल्लांमध्ये अंतिम कुस्ती झाली. सुहासला चितपट करत नागेशने म्हैस पटकावली.
5
तर राजवर्धन घारे, देवा निंबळे, विपुल आडकर, ओंकार दगडे आणि राजू गायकवाड यांना बक्षीसरुपात बकरे मिळाले.
6
या आगळ्या-वेगळ्या बक्षिसांमुळे हा आखाडा पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला.