Akshay Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती चरणी 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य
आज अक्षय्य तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अक्षयतृतीयेनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे.
आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे.
पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीनं दरवर्षी अक्षयतृतीयेनिमित्त हा आंब्याचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात येतो.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची आरास करण्यासाठी वापरण्यात आलेले आंबे उद्या ससून रुग्णालयातील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.
आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भक्तांची गर्दी झाली आहे.
आंबा महोत्सवनिमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशा ताई खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
त्यानंतर सकाळी 8 ते 12 गणेश याग, दुपारी 12.36 ला भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री 9 वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे
संपूर्ण मंदिर परिसरात हापूस आंब्यांचा सुगंध पसरला आहे.