Pune News : जबाबदार बहिणींची माया! सीमेवरील सैनिकांकरीता पुणेकरांतर्फे हजारो राख्या
भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मात्र कोणाशीही रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात.
सरहद्दहीवरील अशा हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी हजारो राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.
विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित केलेल्या राख्यांचे पूजन पुणेकरांनी भारत मातेच्या जयघोषात झाले.
सैनिक मित्र परिवारातर्फे कसबा पेठेतील तांबट हौद चौकातील महाकालिका मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात एव्हरेस्टवीर सुविधा कडलग यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबचे विपीन शेठ, स्वाती पंडित, वृषाली पटवर्धन, श्वेता पोटफोडे उपस्थित होत्या.
सैनिकांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र, पत्र आणि राख्या पाठविण्यात आल्या.
एव्हरेस्ट मोहिमेच्या आठवणी आणि प्रवास सुविधा कडलग यांनी उपस्थितांसमोर उलगडला.