Ajit Pawar : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं.
pune news
1/9
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच (Pimpri chinchwad) पिंपरी चिंचवड (Ajit Pawar) या एकेकाळच्या त्यांच्या बालेकिल्ल्यात आले आहेत.
2/9
त्यामुळं शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
3/9
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला आहे.
4/9
अजित पवारांना मानणारा पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा वर्ग आहे. अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांचा पाठिंबादेखील आहे.
5/9
त्यामुळे आता सत्तांतरानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
6/9
यावेळी अजित पवारांना मोठा हार घालण्यात आला.
7/9
त्यांच्यावर पुष्प वर्षावदेखील करण्यात आला.
8/9
शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुकाई चौक येथे ढोल ताशाच्या गजरात अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
9/9
यानंतर अजित पवार महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत.
Published at : 25 Aug 2023 11:52 AM (IST)