Ajit Pawar : अजित पवारांनी सपत्नीक घेतलं मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन, कोणतं साकडं घातलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसत्तानाट्यानंतर ते दोन महिन्यांनी बारामतील हजेरी लावत आहे.
त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या मोरगावच्या श्री मयुरेश्वराचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले.
राज्यासमोरील सर्व संकटं दूर व्हावीत, सर्वदूर पाऊस पडावा, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता सुखी व्हावी, असं साकडं श्री मयुरेश्वराच्या चरणी घातलं.
यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
आपल्याच बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच येत असल्याने त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बारामतीकडे जाताना वाटेत अजित पवारांवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
अजित पवार बारामतीत येणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठे मोठी उत्सुकता दिसत आहे.