In Pics : शिवाजीनगरच्या भूमिगत मेट्रो स्टेशनवर शिवरायांचा इतिहास उलगडणार
शिवाजी नगर मेट्रो स्टेशन हे काम पूर्ण झालेले पहिलं भूमिगत मेट्रो स्टेशन आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया स्टेशनचं 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.
हे स्टेशन मल्टी-मॉडल इंटिग्रेशनसह नियोजित आहे.
स्टेशनचे प्रवेश/निर्गमन हे शिवाजी नगर रेल्वे स्थानक, PMPML आणि MSRTC बस डेपो आणि हिंजवडी मेट्रो मार्गासह एकत्रित केले आहे.
शिवाजी नगर भूमिगत स्टेशन हे मुख्य रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर आहे
शिवाजी नगर मेट्रो स्टेशनमध्ये 5 लिफ्ट असतील ज्यात 3 लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत आणि 12 एस्केलेटर त्यापैकी 6 बसवण्यात आले आहेत.
या संपूर्ण परिसराला आणि स्टेशनच्या क्षेत्रासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील परिसराचे स्वरूप आणि अनुभव देण्याचा प्रस्ताव महा मेट्रोने मांडला आहे.
येत्या काहीच दिवसात या भूमिगत मार्गातून मेट्रो धावणार आहे.
शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी एकूण पाच भूमिगत स्टेशन असणार आहेत.