PHOTO : सुंदर पैठणी, विविध पदार्थांचे रुखवत; बारामतीत खिल्लार गायीचं डोहाळ जेवण
बारामती तालुक्यातील माळेगावात धंगेकर कुटुंबाने चक्क खिल्लार गायीचे डोहाळे जेवण केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहौसा असे डोहाळे जेवण झालेल्या गायीचे नाव आहे.
योगिता आणि नानासाहेब राणे यांनी आपली मुलगी सोनियाच्या विवाह प्रसंगी धंगेकर कुटुंबास खिल्लार गायीचे वासरु भेट दिले.
या वासराची धंगेकर कुटुंबियांनी मुलीप्रमाणे जोपासना केली. तिचे हौसा असे नाव ठेवले.
हौसाला डोहाळे जेवण आणि ओटीभरणानिमित्त छान सजवले होते.
पैठणी परिधान करुन हौसाची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.
तसेच विविध पदार्थांचे रुखवत तयार केले होते.
यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांना येवला पैठणी साडी भेट दिली.
तसेच परिसरातील अनेक विधवांना हळदीकुंकू लावून सुवासिनींचा मान दिला.
यानंतर उपस्थित सर्वांना प्रितीभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली