Pune News : दुभाजकांवरील सुर्यफुलांनी पुण्यातील रस्ता बहरला
पुण्यात सध्या संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरातील झाडे बहरली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील येरवडा भागात रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर सूर्यफूल लावण्यात आलेले आहेत.
सुशोभीकरणच नव्हे तर झाडे लावण्याचे उद्देश म्हणजे शहरातील काँक्रेटीकरणामुळे कमी झालेलं पक्षांचं प्रमाण पुन्हा वाढावे हा होय.
दुभाजकावर लावण्यात आलेल्या या सूर्यफुलामुळे या रस्त्याची शोभा आणखी वाढली आहे.
घरोघरी जसा बागा सजवण्याचं काम सुरु आहे. तसंच काम सध्या पुण्याला स्मार्ट आणि आकर्षित दिसण्यासाठी केलं जात आहे.
एरवी मोठी वाहतूक आणि वाहतुक कोंडी असणाऱ्या रस्त्याला गार्डनचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
पुण्यात सध्या रस्त्यांच्या खड्ड्यांची चर्चा जोरात रंगत असताना मात्र या फुलांनी पुणेकरांंचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पुण्यातील इतर परिसरातही सूर्यफूल लावून त्या परिसराचीही सुंदरता वाढावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे..