The Kerala Story : कोथरुडमधील महिला आणि तरुणींना 'द केरल स्टोरी'चे मोफत स्क्रीनिंग
सध्या बहुचर्चित द केरल स्टोरी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला असून, समाजातील ज्वलंत विषय अधिकाधिक माहिला आणि तरुणींनी हा विषय समजून घ्यावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपक्रम घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाटील यांच्या माध्यमातून कोथरुडमधील दहा हजारांपेक्षा जास्त महिला आणि तरुणींना 'द केरल स्टोरी' चित्रपट दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त महिलांनी हा सिनेमा पाहिला आहे.
समाजातील ज्वलंत विषय मांडण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा.
द केरल स्टोरीज हा असाच समाजातील ज्वलंत विषय मांडणारा सिनेमा असून, सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला आहे. हजारो तरुणी आणि तरुणी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.
रविवारच्या सकाळीदेखील अनेक महिलांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती.
पुण्यातील कोथरुड सिटी प्राईडमध्ये या महिनांना केरळ स्टोरी चित्रपट पाहिला.
खडबडून जागं करणारा रविवार असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या.