बोरघाट उतरताना ब्रेक फेल, चालकाचा ताबा सुटला अन् ट्रक पलटला; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात
Accident on Mumbai - Pune Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा ट्रकचा ब्रेकफेल झाल्यानं अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबोरघाट उतरत असताना ब्रेकफेल झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक तिसऱ्या लेन वर पलटला.
पहाटे चारच्या सुमारास खोपोली परिसरात हा अपघात झाला.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघातामुळं 27 एप्रिलच्या विचित्र अपघात सर्वांच्या नजरेस पुन्हा उभा ठाकला. तेव्हा ट्रकचा असाच ब्रेक फेल झाला आणि त्या ट्रकनं तब्बल अकरा वाहनांना उडवले होते.
या अपघातस्थळापासून पुढे तीन किलोमीटरवर आजचा अपघात झाला आहे.
अपघाताचे कारणही ब्रेकफेलचेच आहे. सुदैवाने यावेळी कोणती मोठी दुर्घटना झाली नाही.
या अपघातामुळे पुन्हा एकदा अवजड वाहतुकीवर आणि त्यांच्या मेंटेनन्सकडे होणारं दुर्लक्ष यावर प्रश्न उपस्थित झालेले आहेत.