Trible Children School: आदिवासी पाड्यावरील मुलं पहिल्याच दिवशी रमले शाळेत
आदिवासी पाड्यावरील मुले पहिल्याच दिवशी शाळेत रमताना दिसली. श्रमजीवी संघटना व श्रमजीवी सेवा दलाकडून मुलांचं स्वागत कऱण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघर, मुंबई, ठाण्यात ही शाळा भरते. मुलांनी उत्साहाने शाळेत जावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, शिक्षणाविषयी जनजागृती करणे, नविन प्रवेश घेणा-या मुलांचे स्वागत करणे ही वीस वर्षांपुर्वी संघटनेने सुरू केलेली परंपरा आजही सुरू आहे.
श्रमजीवी संघटना व श्रमजीवी सेवा दलाकडून गावागावातील जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळेत जाणा-या विद्यार्थ्यांचे स्वागत होत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे दीर्घकाळानंतर आज विद्यार्थी प्रत्यक्ष विद्येच्या मंदीरात पाऊल ठेवत आहेत.
मजुरीसाठी कुटुंबांचे होणारे स्थलांतर, गरीबी, भावंडाना सांभाळणे, बालमजूरी अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित होती. ही बाब लक्षात घेऊन 1990 सालापासून श्रमजीवी संघटनेने शिक्षणाच्या या प्रश्नावर काम करण्यास सुरूवात केली.
भोंगा शाळा संकल्पनेची दखल घेऊन पुढे सरकारने शिक्षणाचा कायदा येण्याच्या पुर्वी 1997 साली महात्मा फुले शिक्षण हमी योजना सुरू केली होती.