Sant Tukaram maharaj Temple: मोदींच्या हस्ते पार पडलं शिळा मंदिराचं लोकार्पण, पहा exclusive फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. अखेर या मंदिराचे लोकार्पण झालं आहे.
मोठ्या उत्साहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी वारकऱ्यांनी स्वागत केले. जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही.
तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता.
मंदिरात स्थापित केलेल्या दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर कळस नव्हता. त्या शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची 42 इंच सुबक मूर्ती आहे. तर मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत.
संत तुकोबांची काळ्या पाषाणातील ही मूर्ती 42 दिवसांमध्ये उभारली आहे. ही मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे, पिंपरी चिंचवड यांनी तयार केली आहे.
सर्वोदय भारत शिल्पकला कन्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे मंदिर उभारणीचं काम देण्यात आलं होतं. मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे.
एकूण खर्च हा 1 कोटी 17 लाख 47 हजार 500 रुपये आला आहे.