केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात कामगिरी करणारा पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक-नाशक पथकातील श्वान ‘तेजा’ आज निवृत्त झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलीस दलातील 10 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या तेजाला भावपूर्ण वातावरणात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नुकताच निरोप देण्यात आलाय.
11 जानेवारी २०१५ रोजी तेजाचा जन्म झाला, त्यानंतर महिनाभरात त्याचा पुणे पोलिसांच्या बाॅम्बशोधक-नाशक पथकात समावेश करण्यात आला.
शिवाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) श्वान प्रशिक्षण केंद्रात तेजाला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून लॅब्रोडोर जातीचा तेजा बॉम्बशोधक-नाशक पथकाच्या सेवेत रुजू झाला होता
काही वर्षांपूर्वी भोसरीतील दिघी रस्त्यावर एका घरासमोर रानडुकराच्या शिकारीसाठी वापरले जाणारे गावठी बॉम्ब फेकून देण्यात आले होते. एका बालिकेने खेळता-खेळता चेंडू समजून एक हातबॉम्ब हातात घेतला आणि स्फोटात तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बीडीडीएसचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यावेळी झुडपांत टाकून दिलेले गावठी बॉम्ब तेजाने एकट्याने शोधून काढले होते
गेल्या 10 वर्षांपासूनचा सोबती तेजा आज निरोप घेत असल्याने अधिकारी व कर्मचारीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यांनी फुले उधळून, केक कापून त्याला निरोप दिला