एक्स्प्लोर
Supriya Sule : चांदणी चौकातील पुलावर खड्डा; सुप्रिया सुळे थेट चांदणी चौकात पोहचल्या अन्..
सुप्रिया सुळे थेट चांदणी चौकातील पुलाची पाहणी केली आहे.
pune news
1/8

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील चांदणी चाैकाच्या कामाची पाहणी केली.
2/8

उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.
3/8

त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे.
4/8

त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत.
5/8

त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
6/8

त्यामुळे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन यावर चर्चा केली जाणार आहे.
7/8

यावेळी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन रस्त्याच्या संबंधित सर्व त्रुटी दूर करुण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
8/8

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, पुणे शहर युवकाध्यक्ष किशोर कांबळे, कुणाल वेडे पाटील, किरण वेडे पाटील, महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Published at : 05 Nov 2023 01:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























