Tomato : एका एकरात टोमॅटोचं 20 लाखांचं उत्पन्न; शेतकरी लखपती
पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील कांबळवाडी येथील शेतकऱ्यांना टोमॅटोने लखपती केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील चार वर्षात या टोमॅटो उत्पादकांचा झालेला तोटा यावर्षी शेतकऱ्यांनी भरुन काढल. यावर्षी टोमॅटोला विक्रमी भाव मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
पुरंदर मधील छोट्याश्या कांबळवडीतील दोन शेतकरी लखपती झालेत. त्यांना आत्तापर्यंत एकरी 20 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न टोमॅटोतून मिळाले आहे.
कांबळवाडी येथील शेतकरी अरविंद काळभोर यांनी मे महिन्यात साधारण सव्वा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. यंदा पाऊस कमी आणि टोमॅटोची आवक कमी असल्याने त्यांना बाजारात चांगला भाव मिळाला आहे.
अरविंद काळभोर आणि स्वप्नील काळभोर या दोघांची जमीन डोंगराच्या आगदी कडेला आहे.
साधारणपणे 2000 रुपये ते 4000 रुपये असा एका टोमॅटोच्या कॅरेटला भाव मिळालाय. त्यामुळं पुरंदर मधील छोट्याश्या कांबळवडीतील दोन शेतकरी लखपती झालेत.
स्वप्नील काळभोर या तरुणाला देखील टोमॅटोने लखपती केलं आहे. विशेष म्हणजे मागील चार ते पाच वर्षात त्याला याच पिकातून मोठा तोटा झाला होता. पण यावेळेस त्याला चांगला फायदा झालाय. त्याला आत्तापर्यंत 20 लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे.
उन्हाळ्यात या भागात पाणीच नसते पण या दोघांनीही शासनाच्या शेततळ्याच्या योजनेचा लाभ घेतला आहे. आपल्या शेतात शेततळे तयार केले आहे. यातून ठिबक सिंचनचा वापर करून पाच एकर क्षेत्र बागायत केले.
कांबळवाडी येथील शेतकरी अरविंद काळभोर यांनी मे महिन्यात साधारण सव्वा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. यंदा पाऊस कमी आणि टोमॅटोची आवक कमी असल्याने त्यांना बाजारात चांगला भाव मिळाला आहे.