Somvati Amavasya 2023 : सोन्याची जेजुरी...यळकोट यळकोटचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण; जेजुरी गडावर सोमवती यात्रा!
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज सोमवती यात्रा भरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्षभरात गडावर अनेक यात्रा उत्सव होत असतात.
सोमवारी अमावस्या येते तेव्हा गडावर सोमवती यात्रा भरते.
या दिवशी खंडोबाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीमध्ये स्नान घातले जाते.
या सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात.
आज सकाळपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे.
आज सकाळी 11 वाजता उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीत स्नान घालण्यात येणार असल्याने सकाळीच पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला आहे.
खांदेकरी, मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जात असतात या सोहळ्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली.
पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलं आहे.