Shiv Jayanti : 'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय'; शिवजयंतीच्या मिरवणुकीत हिजाब घालून विद्यार्थी सहभागी
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली .
एकूण 9 हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले.
मिरवणुकीचे हे 22 वे वर्ष होते.
आझम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग होता.
पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्युट, जूना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, संत नरपतगीरी चौक, नाना चावडी चौक, अरुणा चौक, अल्पना टॉकीज, डुल्या मारूती चौक, तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके चौक मार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता झाली.
मिरवणूकीत आझम कॅम्पसमधील विद्यार्थी, शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बॅण्डची दोन पथकं होती.
सोबतच ढोल-ताशांचे पथक, शोभीवंत बैलगाडीत शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा, तुतारी, नगारे देखील होते.