Pune Krushna Janmashtami : 250 पेक्षा जास्त पक्वान्नांचा नैवेद्य, 100 वेगवेगळे द्रव्य; इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा
राधे कृष्ण गोपाल कृष्ण... च्या जयघोषात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता येथील मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवृंदावनातील बरसाना, नंदगाव, गोविंदकुंड, राधाकुंड अशा वेगवेगळ्या ठिकाणांचे देखावे अनुभविण्यासोबतच सुंदर अशा पाळण्यामध्ये राधाकृष्ण विराजमान झालेले असताना प्रत्येक भक्ताने राधाकृष्ण यांना पाळणा देत जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला.
मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, संपर्क प्रमुख जनार्दन चितोडे, उत्सव समन्वयक अनंतगोप प्रभू, प्रसाद कारखानीस, भक्ती भोसले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मंदिराचे उपाध्यक्ष रेवतीपती प्रभू, जयदेव प्रभू यांनी अभिषेकाची आणि उत्सवाची व्यवस्था पाहिली. जन्माष्टमी निमित्त पहाटे 4:30 वाजता मंगल आरतीने प्रारंभ झाला.
सुमारे 1200 परिवारांनी भगवंतांना अभिषेक केला. अभिषेकासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्तांना पवित्र धागा घालून चंदन, अत्तर लावून त्यांना अभिषेकाच्या ठिकाणी पाठवण्यात येत होते.
अभिषेकानंतर प्रत्येक परिवाराला चरणामृत देण्यात येत होते.
जन्माष्टमीनिमित्ताने यंदा 2.5 ते 3 लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
भगवान श्रीकॄष्णाला अभिषेक करुन, 250 पेक्षा जास्त पक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला.
या अभिषेकामध्ये दूध, दही, तूप, मध, फळांचा रस इत्यादी सुमारे 100 वेगवेगळ्या द्रव्यांचा समावेश केला जातो.
त्यानंतर रात्री 12 वाजता आरती देखील झालीमंदिरात 24 तास कीर्तन-भजन चालू होते. अनेक प्रकारच्या धार्मिक आणि पूजेच्या वस्तूंचे सुद्धा प्रदर्शन तसेच, इस्कॉनच्या विविध उपक्रमांचे आणि वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते.