Pune Dahi handi : आला रे आला.. गोविंदा आला! पुण्यात बाळगोपाळांसाठी खास 'खेळणी दहीहंडी'
बालगोपाळ आणि छत्रपती शिवरायांच्या बाल मावळ्यांनी खेळण्यांची अभिनव दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ आणि नवयुग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव बालगोपाळ खेळणी दहीहंडीचे आयोजन केले होते.
मावळा पगडी परिधान केलेले शालेय विद्यार्थी आणि बाळगोपाळांनी ही हंडी फोडली.
आपल्या मुलांना खेळता खेळता छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, या उद्देशाने बनवलेल्या 'मावळा' या राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्डगेमच्या जिवंत प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
यासह आवर्तन ढोल ताशा पथक व रुद्रांग वाद्यपथक (ट्रस्ट) पुणे यांचे बहारदार वादनाने खेळणी दहीहंडी उत्सवाला साज चढला.
समाजभूषण स्वर्गीय बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे व देशभक्त केशवराव उर्फ तात्यासाहेब जेधे यांचा वारसा पुढे चालवत असताना दहीहंडी उत्सव मुलांसोबत साजरा करावा, या विचाराने ही वेगळी बालगोपाळ खेळणी दहीहंडी आयोजिली होती.
यामध्ये 100 ते 150 प्रकारच्या दीड हजारांहून अधिक खेळणीचा समावेश होता. ही खेळणी अनाथ मुलांच्या संस्थांमध्ये, तसेच दुर्गम भागातील मुलांना वाटण्यात आली.
मावळा खेळदेखील बाळगोपाळांनी खेळला.